- ४,२६३ अर्जदारांना मिळणार अनामत रकमेचा परतावा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १४ मे २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पेठ क्रमांक १२ व ३०-३२ मधील १,०२९ सदनिकांच्या गृहयोजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या सोडतीत ८७१ अर्जदार पात्र ठरले होते. त्यापैकी ३९९ लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारल्या असून ४७२ जणांनी सदनिका नाकारल्या आहेत.
सोडतीत अयशस्वी ठरलेले तसेच सदनिका नाकारणाऱ्या एकूण ४,२६३ अर्जदारांना पुढील १५ दिवसांत अनामत रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएने दिली. सर्व परतावा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना रिक्त सदनिकांसाठी संधी दिली जाणार आहे.
सहआयुक्त पूनम मेहता यांनी पारदर्शकतेला प्राधान्य देत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी परतावा प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत असल्याचे सांगितले.














