- नगरसेविका सौ. श्रुती राम वाकडकर यांचे आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २८ मे २०२६) :- वाकड परिसरातील बेंगळुरू–मुंबई महामार्गावरील वाकड पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. नागरिकांना होत असलेला वाढता त्रास लक्षात घेऊन नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका सौ. श्रुती राम वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन सदर काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
सकाळी व संध्याकाळी वाकड, पुनावळे, ताथवडे, हिंजवडी तसेच परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाकड पुलाचे काम वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले होते. मात्र काम अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे पुलाचे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे तसेच काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक नियोजनासाठी आवश्यक तात्पुरत्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आयुक्तांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागास आवश्यक सूचना दिल्या.
तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिद्धी देण्यात यावी हि नम्र विनंती.















