न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मे २०२६) :- जनगणना प्रक्रियेस नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
‘जनगणना २०२७’ अंतर्गत महापालिका क्षेत्रात १६ मेपासून घरसूचीकरण व घरगणना प्रक्रिया सुरू असून प्रगणकांकडून नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. १ ते १५ मेदरम्यान स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना मिळालेला स्व-गणना ओळख क्रमांक (SE ID) प्रगणकांना द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अद्याप स्व-गणना न केलेल्या नागरिकांची माहिती प्रगणकांकडून प्रत्यक्ष भेटीद्वारे नोंदवली जात आहे. ही प्रक्रिया १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांच्या प्रभावी नियोजनासाठी अचूक जनगणना माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याचे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.















