न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. ३ जून २०२६ :- वाकड परिसरातील एका स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापार प्रकरणाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला.
या प्रकरणी महिलेला (वय ३४, रा. पुनावळे) अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड-हिंजवडी रोडवरील विशाल नगर येथील ‘ZEN SPA’ येथे छापा टाकण्यात आला. आरोपी महिला स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पीडित महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होती.
तसेच त्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, संबंधित स्पा सेंटरच्या परिसरात मंदिर तसेच रुग्णालय व सार्वजनिक ठिकाणे असतानाही आरोपीकडून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी महिला पोलीस हवालदार निलम संतोष बुचडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास किशोर पाटील करीत आहेत.















