न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीचे प्रकल्प अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, केवळ प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करून हा तपास पूर्ण होऊ शकत नाही. कंपनीचे मालक आणि संचालक मंडळालाही सहआरोपी करण्याची मागणी पुढे आली आहे.
या मागणीमागे ‘स्ट्रिक्ट लायबिलिटी’, कॉर्पोरेट क्रिमिनल लायबिलिटी, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम १६, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६, तसेच ‘विलफुल ब्लाइंडनेस’ आणि ‘मेंस रिया’ या कायदेशीर तत्त्वांचा आधार देण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम, सुरक्षा नियमांचे कथित उल्लंघन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आवश्यक पुरावे समोर आल्यास पुरवणी दोषारोपपत्राद्वारे कंपनीच्या संचालकांचा सहआरोपी म्हणून समावेश करावा आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

















