न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- आचार्य अत्रे रंगमंदिर येथे व्हॉट द मिडिया संस्थेच्या वतीने ‘शिवशैली’ या भव्य नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना, मावळ्यांवरील प्रेम आणि भावविश्व नृत्य, अभिनय व संगीताच्या माध्यमातून साकारण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका वर्षा जगताप, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. उज्ज्वला अंदुरकर आणि डॉ. शैलजा भावसार उपस्थित होते.
आयोजनासाठी संचालक बुद्धभूषण बोदडे, ऋतुराज घरमोडे, विश्वजीत मोरे यांनी मेहनत घेतली. २७ कलाकार सहभागी झाले. निर्माते ऋतुराज डाकवे, मोहित भेंडे, दिग्दर्शक मानसी सदमते, सौरभ भिसे, लेखक विशाल साहेबराव निकम यांनी योगदान दिले. कार्यक्रमाला शिवप्रेमी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


















