- आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा विभागनिहाय आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, पदपथ, स्वच्छता, विद्युत सुरक्षा आणि कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. कृत्रिम विसर्जन हौदांमध्ये स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व सुरक्षा सुविधा उपलब्ध कराव्यात. धोकादायक विद्युत तारा आणि अनधिकृत जोडण्यांवर तातडीने कारवाई करावी तसेच रस्ते खड्डेमुक्त ठेवावेत, असे आयुक्तांनी सांगितले.
प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवावा. पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत आणि अनधिकृत बांधकामांवर बीट निरीक्षकांमार्फत लक्ष ठेवून निष्कासनाची कारवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.


















