न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार पोलिस अधिकारी व अंमलदार ऑगस्ट २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवागौरव सोहळ्याचे आयोजन ३१ ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे करण्यात आले.
सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये पोलिस मुख्यालयातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश भागुजी उगले, पिंपरी पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक अनिल बाबुराव देशमुख, पिंपरी पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक अशोक घनशाम परदेशी आणि हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई शशिकांत बापूसाहेब कांबळे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमात पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा सत्कार केला. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


















