न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून जमावाने तरुणावर धारदार शस्त्रे व लोखंडी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बोपखेलमधील गणेशनगर येथे घडली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दीपचंद यादव (वय २५) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास दुर्गामाता मंदिराजवळील रस्त्यावर हा प्रकार घडला. तुषार प्रकाश डोंगरे (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून आरोपींनी संगनमत करून तुषार याला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.
या प्रकरणात दीपचंद यादव याच्यासह दर्शन यादव (वय १७), सिद्धार्थ पैठणे (वय १७), श्लोक उग्राल (वय १७), अनुज घोंगडे (वय २०), पियुष रोकडे (वय २५), मयंक ऊर्फ मड्डू (रा. सदर) आणि दोन अनोळखी व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे. हल्ल्यात तुषार यांच्या डोक्यावर, हातावर व पायावर गंभीर दुखापत झाली. दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


















