- माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा विश्वास..
- श्री भैरवनाथ दहीहंडीत चाहत्यांचा तुफान जल्लोष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने लवकरच ‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला. भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक योगेश लांडगे यांच्या वतीने आयोजित श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवात तो प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला. सूर्यकुमारच्या आगमनाने हजारो चाहत्यांनी ‘SKY… SKY…’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी सूर्यकुमारने पुणे-पिंपरी-चिंचवड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी असल्याचे सांगत महेश लांडगे यांच्या कार्याचे कौतुक केले. युवा खेळाडूंनी ‘देशासाठी खेळायचं आणि जिंकायचं’ ही जिद्द ठेवावी, असे आवाहनही त्याने केले. भारतीय सण-उत्सव आणि परंपरा ही देशाची अस्मिता असल्याचेही त्याने नमूद केले.
“सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू देशाचे रिअल हिरो असून, त्यांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.


















