- वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता तीन वर्षे संगोपनाची जबाबदारी..
- बांधकाम विश्वातील अग्रणी ‘यशदा रियल्टी’चा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ सप्टेंबर २०२६) :- वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बांधकाम विश्वातील अग्रणी यशदा रियल्टीच्या वतीने पुनावळे येथे रविवारी (दि. ६ सप्टेंबर) वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. ‘ग्रीन रिइमॅजिनेशन प्लांटेशन ड्राइव्ह २०२६’ अंतर्गत झालेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

यशदा रियल्टीने यंदा तब्बल ५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे झाडे लावल्यानंतर त्यांची जबाबदारी संपणार नसून, पुढील तीन वर्षे त्यांच्या देखभाल व संगोपनाची जबाबदारी कंपनीकडून घेतली जाणार आहे.

गतवर्षी याच अभियानातून २ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ८६० झाडे सध्या चांगल्या स्थितीत वाढत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे यंदाच्या उपक्रमातही केवळ लागवडीपेक्षा झाडे जगविण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

या अभियानाला माजी आमदार अश्विनी जगताप, भाजप अध्यक्ष शत्रुघ्न काटे, कुंदा भिसे, अनिता काटे, श्रुती राम वाकडकर, जयनाथ काटे, संजय भिसे, राजू मासुळकर, उद्योजक एन. बी. भोंडवे, वन विभागाचे अधिकारी जगताप व कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यशदा रियल्टीचे सीएमडी वसंत काटे, एमडी सूर्यकांत जाधव, एमडी विजय काटे, नवनाथ धवळे आणि कंपनीच्या टीमनेही वृक्षारोपणात सहभाग घेतला.
याशिवाय देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त विक्रमासिंह महाराज मोरे, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्त रोहिणी पवार, मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, साधकाश्रमचे एच. बी. पी. चिंचबरेश्वर महाराज साखरे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद तसेच अरुण काशीद आणि विर्धा काशीद यांची उपस्थिती होती.

















