- जिद्द, चिकाटी आणि क्रीडाभावनेचे केले प्रदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ ऑक्टोबर २०२६) :- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ८० मिनिटांच्या नॉन-स्टॉप स्केटिंग मॅरेथॉनमध्ये चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सलग ८० मिनिटे स्केटिंग करण्याचे आव्हान स्वीकारत विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडवले.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६.२० या वेळेत ही स्केटिंग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश Forbes Book of World Records, United Arab Emirates World Book of World Records आणि European Union Book of World Records या तीन जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांमध्ये विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न करणे हा होता.
या मॅरेथॉनमध्ये चॅलेंजर पब्लिक स्कूलचे हर्ष बजाज, शनय चेतन धाकटे, समन्यू नरेंद्र अंबाडे, विराज काळूराम इंगवले, अद्वैन बाबासाहेब कोकिटकर, तरुण हरेश माणिक, शिवम संजय बोंबले आणि मोरया चौधरी या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या आव्हानात्मक उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जिद्द दाखवून दिली. अशा क्रीडा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड वाढण्यासोबतच आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत होते.
विद्यार्थ्यांच्या या सहभागाबद्दल चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन संदीप काटे आणि प्राचार्या ज्योतिका मलकानी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


















