- चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले; दुचाकींना धडक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मारुंजी (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :- मारुंजी परिसरात फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कार चालवत असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने समोरून जाणाऱ्या दुचाकींना धडक दिली. या दुर्घटनेत फॉर्च्युनर चालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुंजी परिसरातून फॉर्च्युनर कार जात असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट समोर असलेल्या दुचाकींवर आदळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात फॉर्च्युनर चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, दुचाकीस्वार जखमी झाले आहेत का, तसेच अपघातात किती वाहनांचे नुकसान झाले, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भररस्त्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

















