- ड्रेनेज चेंबरमध्ये चाक अडकले; उभी दुचाकीही चिरडली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरीतील अशोक थिएटर रोडवर वाघेरे पार्कसमोर दगडांनी भरलेला हायवा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली.
या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून, रस्त्याच्या कडेला उभी असलेली सीबीझेड दुचाकीही क्षतिग्रस्त झाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचे एक चाक ड्रेनेज चेंबरमध्ये अडकल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भररस्त्यात ट्रक पलटी झाल्याने परिसरात काही काळ परिस्थिती गंभीर बनली होती.
या घटनेमुळे बांधकामस्थळांजवळ अवजड वाहनांची सुरक्षित वाहतूक आणि ड्रेनेज चेंबरची अवस्था याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी रस्त्यांची आणि ड्रेनेज चेंबरची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
















