- मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०९ नोव्हेंबर २०२६) :- चिखलीतील स्पाईन रोडवरील कृष्णानगर चौकाजवळ एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हान चिखली पोलिसांसमोर आहे.
मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या अंगात राखाडी (ग्रे) रंगाचा टी-शर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा परिसरातून कोणाचा तरुण मुलगा बेपत्ता असल्यास तातडीने चिखली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या खुनामागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

















