- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर २०२६ :- पिंपरी येथील डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन आज गुरुवारी (दि. 5) अचानक जाहीर करण्यात आले आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता या पुलाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली.
दरम्यान, या पुलाच्या उद्घाटनाला होत असलेल्या विलंबाबाबत मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे रखडलेल्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या अचानक जाहीर झालेल्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या माध्यमातून हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून, मुंबई-पुणे महामार्गालगत पिंपरी रेल्वे क्रॉसिंग गेट येथे सायंकाळी पाच वाजता हे उद्घाटन होणार आहे.

















