न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- तापकीरनगरमधील विकसित व सधन शेतकरी तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्यावतीने बैलपोळा मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना शेत मशागतीसाठी व पारंपरिक शेती टिकवण्यासाठी बैलजोडीची मोलाची साथ लाभली आहे. वर्षातून एकदा त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने बैलपोळा साजरा करतात.
यावेळी मच्छिंद्र तापकीर यांनी बैलजोडीची साग्रसंगीत पूजा केली व ढोल, ताशा व भंडाऱ्याची उधळण करीत फटाक्याची अतिषबाजी करत काळेवाडी-रहाटणी परिसरातून बैलजोडींची मिरवणूक काढली, तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे मच्छिंद्र तापकीर यांनी सांगितले.
याप्रसंगी मा. नगरसेविका अनिता तापकीर, सागर तापकीर व परिसरातील शेतकरी व बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.















