न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धा शुक्रवार दिनांक ५ व ६ ऑक्टोबर रोजी पिंपरीतील नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे पार पडल्या.
शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय व के जे गुप्ता ज्यू कॉलेजच्या खेळाडूंनी (ओपन साईड) या प्रकारात चमकदार कामगिरी केली. यात शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय व के जे गुप्ता ज्यू कॉलेजच्या १२ खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
शालेय जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत १४ वर्षीय मुलांमध्ये आदित्य टिळेकर तृतीय क्रमांक, तसेच १४ वर्षीय मुलींमध्ये ज्ञानल सांडभोर तृतीय, १७ वर्षीय मुलांमध्ये पियूष निमसे प्रथम, प्रणव इंदोरे द्वितीय, प्रणव कुसाळकर तृतीय, १७ वर्ष मुलींमध्ये पूनम जाधव प्रथम, श्रद्धा नाईकरे द्वितीय, साक्षी पवार तृतीय, १९ वर्षीय मुलांमध्ये अक्षय निघोट प्रथम, देवेन उकिरडे द्वितीय अजय पाटील तृतीय, १९ वर्ष मुलीमध्ये प्रणाली खाटेकर हीने प्रथम क्रमांक मिळवला.
यावेळी सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, संचालक विजय जाधव, अमित बच्छाव, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक अनिल करपे, उपमुख्याध्यापक किसन अहिरे आदींनी अभिनंदन केले.
क्रीडाशिक्षक दत्तात्रय भालेराव व शब्बीर मोमीन यांनी खेळाडूंना यावेळी मार्गदर्शन केले.















