न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली :- पुढील ४८ तासात इंटरनेट ठप्प होण्याची शक्यता रशिया टुडेने आपल्या वृत्तात वर्तवली होती. त्यामुळे नेटकर्यांमध्ये चांगलीच भंबेरी उडाली आहे. परंतु इंटरनेट ठप्प होण्याचा फटका फक्त १ टक्के लोकांना पडणार आहे असे रशिया टुडेने स्पष्ट केले आहे.
इंटरनेटसाठी आवश्यक डोमेन आणि त्याच्याशी निगडीत माहिती जाळ्याची पायाभूत सुविधा आधुनिक करण्याचं काम करण्यात येणार आहे. द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स एंड नंबर्स (ICANN) इंटरनेटसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल करणार आहे. परंतु ग्राहक ज्या कंपनीकडून इंटरनेटची सेवा घेतात अर्थात आपले इंटरनेट सर्व्हिस प्रोवाईडर्स आहेत त्यांनी जर या पायाभूत सुविधा आधुनिक करण्याचे स्विकारले तरच इंटरनेट युजर्सना हा फटका बसणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हा फटका आपल्या ग्राहकांना बसू नये म्हणून इंटरनेटची सेवा पुरवणारे सिस्टम सिक्युरिटी एक्स्टेंशन हा पर्याय स्विकारून आपल्या ग्राहकांना या मनस्तापापासून वाचवू शकतात. इंटरनेटच ठप्प पडणार ही बातमी वार्यासारखी पसरल्यानंतर नेटकरी चांगलेच धास्तवले. त्यामुळे द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स एंड नंबर्सने हा खुलासा केला आहे.