न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी : जागतिक अंडी दिनानिम्मित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने जागतिक अंडी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सेक्टर २२ प्रभाग क्रमांक १३ मध्ये कै. मधुकर पवळे शाळेमध्ये जागतिक अंडी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक सचिन चिखले यांनी विद्यार्थ्यांना अंडी खाण्याची फायदे व त्यापासून मिळणाऱ्या जीवनसत्वाची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत अंडी खाण्यास दिली व ”संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे” या म्हणीची आठवण करून रोज अंडी खाण्याचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमास नगरसेवक सचिन चिखले, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.