न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई :- ईव्हीएमविरोधात सर्वच विरोधी पक्ष आवाज उठवत असताना, पवारांनी अत्यंत महत्त्वाची माहिती यावेळी दिली. निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावे म्हणून सगळ्या विरोधी पक्षांची येत्या १५ दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पवारांनी दिली.
पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी राफेलपासून सेना-भाजप युतीपर्यंत अनेक विषयांवर मतं व्यक्त केली. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच, भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल, पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही, असेही मत पवार यांनी संगीतले.