न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अलीकडेच विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती.
यावेळी कु. विनायक अशोक मिसाळ याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक १७ सचिवपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीपत्रावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष अक्षय शेडगे, प्रभाग क्रमांक १७ चे अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या सह्या आहेत.
कु. विनायक याने पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थांच्या विकासात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबूत करण्यास प्रयत्न करणार असल्याचे सागितले.












