न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव :- महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, श्री शारदा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका व प्राध्यापिका माधुरी गुरव, कर्तव्य फाउंडेशन, मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य मेडिको संस्थांच्यावतीने व डॉ. लाल पॅथोलॉजी यांच्या सहकार्याने केशवनगर प्रभाग क्रमांक १८ येथील सद्गुरू हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य शिबिरात शुगर, कॉलेस्ट्रोल, ब्लड प्रेशर, आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या. शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तब्बल १५६ नागरिकांनी या शिबिरामार्फत विविध आजारासंदर्भात तपासण्या करून घेतल्या.
यावेळी लोक लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, नगरसेवक, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, बिभीषण चौधरी, महावितरण सदस्य, भारती विनोदे, मुकुंद गुरव पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष, सौरभ शिंदे प्रभाग अध्यक्ष, गणेश बच्चे, अथर्व गुरव, गिरीश हंपे, महिला अध्यक्षा रोहिणी बच्चे, सौरभ कर्नावट, जुबेर शेख आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.












