न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव :- शिवसेनेच्या पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी नुकतीच मुखपत्र सामना मध्ये प्रकाशित झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये ही यादी जाहीर झाली असून, पिंपरी चिंचवड मनपाच्या मा. नगरसेविका सुलभ उबाळे यांची भोसरी, खेड, शिरूर विधानसभेच्या महिला आघाडी जिल्हा संघटिका पदी निवड करण्यात आली आहे.
सुलभा उबाळे या पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या सक्रीय व जुन्या महिला पदाधिकारी असून पक्षाकडून मागील भोसरी विधानसभा निवडणूकीचा फड त्यांनी गाजवीला आहे. शिवसेना पक्षाच्या कट्टर व आक्रमक शैली व पवित्र घेणाऱ्या अशी पिंपरी-चिंचवड शहरात त्यांची ओळख आहे.