न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका कमल घोलप यांनी उद्यानाच्या कामासंदर्भात उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांना दूरध्वनीवरून माहिती घेतली असता संभाषणा दरम्यान त्यांनी घोलप यांना उद्धट भाषा वापरली.
यावेळी महापौर राहूल जाधव यांच्या दालनात घोलप यांनी त्या अधिका-याला चांगलेच फैलावर घेत साळुंके यांना बोलावून जाब विचारला, तसेच तुमची महापालिकेत किती वर्षे सेवा झाली आहे? महिला नगरसेविकांशी कशाप्रकारे बोलायला हवे? हे तुम्हाला समजत नाही का ? अशा शब्दांत सुनावले.
संप्तत झालेल्या घोलप यांनी महापाैर राहूल जाधव यांच्याकडे त्या अधिकाऱ्याची तक्रार केली. यावेळी महापौर राहुल जाधव यांनी उद्यान अधिक्षकांना फैलावर घेत कानउघडणी करत, पुन्हा अशी भाषा वापरल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, यापुढे लोकप्रतिनिधीशी बोलताना नीट बोला, अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही अशी समज दिली.












