न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- भारत निवडणूक आयोगामार्फत १ /१/२०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
येत्या रविवारी दि. २१ व पुढील रविवार दि. २८ विशेष मोहिमेअंतर्गत महिला, १८ वर्षावरील नवमतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार मदत केंद्रांवर फॉर्म नं. ६, ७, ८ व ८ ‘अ’ चे फॉर्म स्वीकारण्याचे कामकाज करण्यात येणार आहे.
मतदार मदत केंद्रे
१ मतदार नोंदणी अधिकारी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय,
२ यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुल, दुसरा मजला, थेरगांव,
३ पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य इमारत, करआकारणी व करसंकलन विभाग,
४ ब, ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय.
पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले आहे.















