न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड येथील पोलीस हवालदाराने आजाराच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रकांत टिळेकर असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव असून बुधवार दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
ते निगडी पोलीस ठाण्यात कार्यकरत होते, दरम्यान त्यांना चिखली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते. तोंडाच्या कँसरने आजारी असल्यामुळे गेली तीन महिन्यांपासून ते रजेवर होते.
दरम्यान त्यांना चिखली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते, परंतु आजारपणामुळे ते चिखली पोलीस ठाण्यात हजर राहू शकले नाहीत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.















