न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतीचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती समितीने सह शहर अभियंतापदी पदोन्नती दिलेली आहे.
याबाबतचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज शुक्रवारी (दि. १९) रोजी विधी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. तथापि, विधी समितीने तो प्रस्ताव तहकूब ठेवला आहे.
‘सह शहर अभियंतापदी बढती कशी दिली? आरक्षण आहे का? याची सविस्तर माहिती प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे हा विषय तहकूब ठेवण्यात आला असून प्रशासनाकडून सविस्तर माहिती आल्यानंतरच हा विषय मंजूर करण्यात येईल, असे विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी माध्यमांना सांगितले.












