न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चिखली येथील वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल सार्वजनिक मंडळाच्या वतीने रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, कचरा आदी समस्यांचे फलक तयार करून पेट्रोल, गॅसचे दरवाढ अशा महागाई रुपी रावणाचे दहन करण्यात आले.
अभिनेते अमोल कोल्हे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहराचा शिवसेना संपर्कप्रमुख असताना देखील भोसरी विधानसभेची दिशा चिखलीतील साने चौकातून परिवर्तीत होते.
दत्ता साने म्हणाले, १०० दिवसांत रेड झोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाने सत्ता मिळवली. परंतु दोन वर्षानंतरही दोन्ही प्रश्न सुटले नाहीत. फक्त शासकीय निर्णय झाल्याचे जनतेला खोटे सांगितले. सर्वसामान्यांची दिशाभूल करत प्रश्न मार्गी लागल्याचे सांगत फलकबाजी केली.












