न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- चिंचवड नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ बुधवारी (दि. १७) उत्साहात संपन्न झाला.
बक्षिस समारंभाच्या वेळी रंग माझा साडीत वेगळा, मंगळागौर स्पर्धा आणि भजन स्पर्धा या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. सर्व स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक – रोख रक्कम १००००रु, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक – रोख रक्कम ५०००रु , प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांक – रोख रक्कम ३०००रु, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप होते. मंगळागौर स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे बक्षिस ‘नऊवारी नार’ च्या संचालिका सौ.चैताली भोईर यांच्या वतीने तर रंग माझा साडीत वेगळा स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे बक्षिस ‘शंभो सारीज’ च्या संचालिका मीनल गुजर यांच्या वतीने देण्यात आले. याचसोबत सामुहिक मृदंग वादनातील निवडक सहभागींना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व स्पर्धांमधील सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व नगरसेविका सौ.अश्विनी गजानन चिंचवडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे – १) रंग माझा साडीत वेगळा – स्वामिनी ग्रुप (प्रथम क्रमांक), आनंदवन ग्रुप (द्वितीय क्रमांक), सागरिका ग्रुप (तृतीय क्रमांक), २) मंगळागौर स्पर्धा – रणरागिणी ग्रुप (प्रथम क्रमांक), आनंदवन ग्रुप (द्वितीय क्रमांक), गीताई ग्रुप (तृतीय क्रमांक), ३) भजन स्पर्धा – जय गणेश भजनी मंडळ,थेरगाव (प्रथम क्रमांक), संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ,मावळ (द्वितीय क्रमांक), हरी ओम भजनी मंडळ,चिखली (तृतीय क्रमांक), ४) विशेष सन्मान – सौरभ भोंडवे (मृदंग वादन), अरुण बोनकर (तबला वादन), चंद्रकला बिरादार (संवादिनी).
बक्षिस वितरण समारंभाच्या प्रसंगी ज्ञानदेव बोरुडे, अरुण बोनकर, केशव नेर्लेकर, मधुकर मोरे, अविनाश लेले, मीराताई काटमोरे, रावसाहेब परकाळे गुरुजी, सुखदेव महाराज बुचडे, बाळासाहेब वाल्हेकर, दत्तात्रय भोंडवे, राजश्री गागरे, क्षमा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.












