न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिर्डी – शिर्डी येथे साई समाधी शताब्दी वर्षाच्या सांगतेसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते. यावेळी शिर्डीत साईसमाधी सोहळ्याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. मोदींनी शिर्डीत आल्यावर साईबाबांची मनोभावे पूजाअर्चा केली.
त्यानंतर शिर्डी येथे नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी जाहीर सभेत मोदी यांच्या हस्ते २० हजार लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचा मदतीसाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार पूर्णपणे मदत करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील भाषणातील महत्वाचे मुद्दे : .
महाराष्ट्रात पाऊस कमी पडला आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की, पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत तुम्हाला मिळेल. यासाठी महाराष्ट्र सरकार जी पावलं उचलेल, त्यासाठी केंद्र सरकार पूर्ण सहयोग देईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.











