न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आजच्या सर्वसाधारण सभेच्या निम्मिताने विरोधकांनी केवळ पाणी…. पाणी….. पाणी….. या प्रश्नावरून सत्ताधारी व प्रशासनाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यावरुन सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारातच आंदोलन केले.
महापाैर पाणी द्या, नाय तर खुर्च्या खाली करा, पाणी चोर पाणी चोर, भाजप सरकार पाणी चोर, दारु घरपोच मिळेल, पण पाणी मिळणार नाही, अशा घोषणा देवून सत्ताधाऱ्यांची पालिका परिसरात चांगलीच कोंडी केली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण सभा दुपारी दोनला सुरु होणार होती. त्याअगोदर सर्व विरोधकांनी विस्कळीत पाणी पुरवठ्यावरुन आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक मयुर कलाटे, नाना काटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संजय वाबळे, समीर मासूळकर, विनोद नढे, राहुल भोसले, विक्रांत लांडे, संतोष कोकणे, राजू बनसोडे, नगरसेविका वैशाली काळभोर, अपर्णा डोके, सुलक्षणा धर, संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, उषा काळे, सुमन पवळे, माई काटे, अनुराधा गोफणे, पोर्णिमा सोनवणे, निकिता कदम, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, सुलभा उबाळे, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शीले, अश्विनी वाघमारे, मनसेचे सचिन चिखले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.