न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापालिकेची चालू महिन्याची सर्वसाधारण सभा महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पाणीप्रश्नावरून विरोधक व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकामध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले.
पाणी प्रश्नावरून महापालिका सर्वसाधारण सभेत रणकंदन झाले. शेवटी नगरसेवकांनी आयुक्तांना भांडावून सोडले, परंतु अंतिम वेळी आपले पितळ उघड होऊ नये याकरिता सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांना पंखाखाली लपवले. आयुक्तांनी पुढील सर्वसाधारण सभा ३१ ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी, पवना बंदिस्त जलवाहीनीची संकल्पना आमची होती. आंद्रा- भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे देखील आम्ही नियोजन केले होते. परंतु, सत्तांतर झाल्यानंतर त्या योजना रखडल्या आहेत. पाणी न मिळाल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
महापालिका सर्व साधरणसभेत नगरसेविका विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, सिमा सावळे, सुलक्षणा धर, अनुराधा गोफणे, स्वाती काटे, वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, पौर्णिमा सोनवणे, आरती चोंधे, नीता पाडाळे, उषा ढोरे, झामाबाई बारणे, मीनल यादव, संगीता ताम्हाणे, आशा शेंडगे, सुनिता तापकीर, स्वाती काटे, शैलजा मोरे, प्रियंका बारसे, नगरसेवक योगेश बहल, नितीन काळजे, राहुल कलाटे, मयुर कलाटे, पंकज भालेकर, नामदेव ढाके, राजेंद्र लांडगे, चंद्रकांत नखाते, सचिन चिखले, संदीप कस्पटे, संदीप वाघेरे, अंबरनाथ कांबळे, प्रमोद कुटे, हर्षल ढोरे, बाळासाहेब ओव्हाळ आदींनी सहभाग नोंदवला.