न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- गुरुवार दि. १८ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, हर्षल ढोरे, सुरेश भोईर, तुषार कामठे, संदीप नखाते व नगरसेविका आरती चोंधे, सुनिता तापकीर, नीता पाड़ाळे, चंदा लोखंडे, साधना मळेकर, भारती विनोदे तसेच सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, संजय भिसे, चंदा भिसे, कुंदा भिसे, विजुआण्णा जगताप, योगेश मालख़रे व विविध सोसायट्यांचे चेअरमन व कमिटी मेंबर्स, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक संघ व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी विजयादशमी निमित्ताने नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फ़ाउंडेशनच्या वतीने जेष्ठ नागरीक संघटनेला खुर्ची वाटप करण्यात आले.
यावेळी लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवड़ व पिंपळे सौदागरच्या विकासाविषयी थोडक्यात माहिती दिली.
महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, शेखरभाऊ कुटे (भा.वा.सं.काे) व सागर बिरारी यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.