न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी येथील इंद्रायणी कॉ ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सीए मनोज अगरवाल तर उपाध्यक्षपदी ऍड रामहरी कसबे यांची निवड करण्यात आली.
बँकेच्या झालेल्या सभेप्रसंगी निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आले. मावळते अध्यक्ष ऍड एस.बी चांडक यांनी पदाची सूत्रे नवीन अध्यक्ष सीए अगरवाल व ऍड कसबे यांच्याकडे देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी मावळते उपाध्यक्ष अरूण शिनकर, सीए महेश चांडक, सुरेश जुमानी, पोपट पवार, सीए बालाजी पेन्सलवार, लक्ष्मण गिरी, ऍड पद्मजा शिंदे, सुवर्णा झोळ, गोविंद दरगड, शहाजी पडलगरे आदी संचालक तसेच सीईओ अनिल दोशी, सहाय्यक महाव्यवस्थापक विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बँकेच्या १६४ कोटी ठेवी तर कर्ज ९० कोटी आहे. उलाढाल २५० पेक्षा जास्त आहे. ७ शाखा कार्यरत आहेत. बँक स्थापनेपासून बँकेचा ऑडिट वर्ग अ आहे. ग्राहकांच्या सोयी साठी पिंपरी शाखेत ई गॅलरी सुरु केली असून रक्कम काढणे, रक्कम भरणे, पासबूक प्रिंट करणे या सुविधा 24 तास पुरविल्या जातात.