न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या शरद ऋतूतील आश्विन ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. उद्या (दि. २३) मंगळवार रोजी कोजागिरी पोर्णिमा शहरात उत्साहात साजरी केली जाणार आहे.
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.
यावर्षी कोजागिरी पोर्णिमा साजरी करण्यासाठी महापालिकेची उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली न ठेवता रात्री एक वाजेपर्यंत खुली राहणार असल्याचे उद्यान विभागाकडून कळविण्यात आले आहे.










