न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- शंतनू ऊर्फ नाना विलास नांदगुडे व अन्य चार जणांविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून मा. नगरसेवक विलास नांदगुडे यांचा शंतनू ऊर्फ नाना विलास नांदगुडे (रा. पिंपळे निलख) हा मुलगा आहे.
शंतनू ऊर्फ नाना विलास नांदगुडे व त्याचे तीन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत वाकड येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आणि शंतनू नांदगुडे यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादातून हा प्रकार घडला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक आर. एम. केंगार अधिक तपास करीत आहेत.










