न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापालिका आयुक्तांनी चार महिन्यांपूर्वी महत्वाच्या बैठकीस कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या दोन उपअभियंत्यावर सेवानिलंबनाची केलेली कारवाई रद्द करून कामावर परत रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
किशोर सोपाना महाजन व विजयकुमार चंद्रभान काळे अशी या दोघांची नवे असून उपअभियंता पदावरील दोघेही अतिमहत्वाच्या आपत्ती व्यवस्थापन आढाव्यासाठी बोलविलेल्या बैठकीस कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिले होते.
विनापरवाना गैरहजेरीमुळे आपत्ती व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा व जलनि:सारण अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला होता. सदर परिस्थितीस महाजन व काळे हेच जबाबदार असल्याचा अहवाल ‘ग क्षेत्रीय कार्यालयाच्या’ क्षेत्रीय अधिका-यांनी २२ जून रोजी सादर केला होता. या अहवालाची दखल घेत आयुक्तांनी या दोन उपभियांत्यांना पदावरून निलंबित केले होते.










