न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने गोर-गरीब लोकांवर केलेल्या अत्याचाराविरोधात मा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात पालिका प्रशासन व अधिकारी कोणाच्या तरी सांगण्यावरून व कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? अशी शंका नाशिक फाटा येथे झालेल्या कारवाई वरुन वाटते. थोड्या गोर-गरीब लोकांवर कारवाई करून पालिका प्रशासन व अधिकारी यांनी ते सिद्ध केलेले आहे. अन्याय झालेल्या लोकांमध्ये अतिशय तीव्र भावना होत्या यावर आयुक्तांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी हाजी गुलाम रसुल सय्यद यांनी आयुक्त यांना सांगितले की, गेली ४० वर्षे आम्ही त्या जागेत आपला व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. पालिकेला कर भरत आहे, तरीही ही अन्यायकारक कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आली आहे. जर अम्हाला न्याय मिळाला नाही तर, महानगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा हाजी गुलाम रसुल सय्यद यांनी दिला आहे.
समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रफीक कुरेशी यांनी आयुक्तांना निदर्शनास आणून दिले की, कशा प्रकारे पालिका अधिकारी व कर्मचारी दुतोंडी कारवाई करतात. जर न्याय करणारे प्रशासकीय अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून कोणाच्या तरी सांगण्यावरून गोर-गरीब लोकांवर कारवाई करणार असतील तर न्याय कोणाकडे मागायचा. जर न्याय मिळाला नाही तर, तिव्र आंदोलनाचा इशारा रफीक कुरेशी यांनी दिला.
तसेच समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सालीम भाई सय्यद यांनी देखील कारवाई चा निषेध व्यक्त करून न्याय देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत आयुक्तांनी माहिती घेऊन जी कारवाई करण्यात आली आहे याची चौकशी करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे.
यावेळी समाजवादी पक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रफीक भाई कुरेशी, हाजी गुलाम रसुल सय्यद, समाजवादी पक्ष पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सालीम सय्यद, रेखा, शंकर भाऊसाहेब डोंगरे, बबन भाऊसाहेब डोंगरे, सामाजीक कार्यकर्ते जिलानी सय्यद, समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सालार शेख, कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते.










