न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी :- आरोही संगीत विद्यालय व नवजीवन शिक्षण संस्था, दिघी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि.१३ ऑक्टो.) रोजी आरोही संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षी या महोत्सवात नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी तसेच भारतीय शास्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा हा आयोजनामागचा उद्देश आहे. पहिल्याच वर्षी पन्नासहून अधिक कलाकारांनी आपल्या गायन वाद्नांची कला सादर केली.
यावेळी मा. नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, कुलदीप परांडे, गायक अंगद गायकवाड, रोहत गडकर, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी कला सादर करून मने जिंकली. कार्यक्रमांचे आकर्षण अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड या बहिणींनी कार्यक्रमात भर आणली. महान गायकांनी गायलेल्या अजरामर कलाकृतींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पं. अंगद गायकवाड यांनीही सुप्रसिद्ध भैरवी सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज शिंदे, कु. रोशनी सुपे यांनी केले तर, कार्यक्रम यशस्वितेसाठी रणजीत राठोड, शिवाजी चामनर, राजपाल गायकवाड, निलेश खेडकर, उदय पाटील, रमेश गावित, मंदार जोशी, सनीला जीरगाळे, गंगासागर डाके, प्रियांका श्रीमंगले, यांनी परिश्रम घेतले.










