न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवीन युवक, युवती, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या येत्या रविवारी (दि. २८) मुलाखती घेण्यात येणार आहेत.
पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात युवासेना, युवती सेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदांसाठी विधानसभा निहाय, विभाग निहाय व महाविद्यालय निहाय मुलाखती आकुर्डी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात येणार आहेत.
यासाठी युवासेना कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी, इच्छुक युवक, युवती, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुलाखतीसाठी रविवार (दि. २८ ऑक्टोबर) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केले आहे.










