न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक आज मंगळवार (दि. २३) रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड या होत्या. बैठकीत एकूण ४६ विषय ठेवले होते. यावेळी एकूण २९ कोटी ५४ लाख २८ हजार रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
नगरसेवक राजू मिसाळ यांनी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अाष्टीकर यांना भांडार विभाग व्यवस्थित सांभाळता येत नाही, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत असून त्यांच्या मनमानी कारभाराला नागरिक वैतागले आहेत. त्या जागी अन्य अधिका-यांची बदली होवूनही त्याचे पदावतन केलेले नाही.
तसेच त्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत, तरीही आयुक्त श्रावण हर्डीकर हे त्यांना पाठिशी घालत आहेत. येत्या आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक राजू मिसाळ यांनी दिला.










