न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची कमतरता भासत असून त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाचा वापर करून आयुक्तालयातील विविध शाखांची सुरुवात करायची आहे. मनुष्यबळाअभावी आयुक्तालयाची फरफट होत असून पोलीस ठाण्यातील मनुष्यबळाकडे देखील लक्ष द्यायचे आहे.
याकरिता पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. २३) रोजी बदल्यांचे आदेश दिले असून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४८ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये ९ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकापैकी एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व ३९ पोलीस उपनिरीक्षक पैकी १३ महिला पोलीस उपनिरीक्षक यांची विविध पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, वाहतूक विभाग, अतिक्रमण विभाग, महिला कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे.










