न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- वाकड येथील जुने वाकड पोलीस स्टेशनच्या इमारतीत वाहतूक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन बुधवार (दि. २४) रोजी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण शहराचे वाहतूक नियंत्रण, एकच कक्षावर अवलंबून असल्यामुळे पोलीस प्रशासनास डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरु होत्या.
त्यानुसार आयुक्तालयाच्या उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यात वाकड येथे वाहतूक विभागाचा नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षासाठी स्वतंत्र नंबर अद्याप सुरू करण्यात आला नसून, मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधूनच वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. लवकरच स्वतंत्र नंबरची सोय करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.










