न्यूज पीसीएमसी नेटवर्क
औंध :- प्रभाग क्रमांक ८ औंध- बोपोडी परिसरात मंगळवार (दि. २३) रोजी नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध डी. पी. रोड या वसाहतीमधील सर्व गल्लीबोळात नवीन ड्रेनेज व सिमेंटच्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन नगरसेविका सुनिता वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी रिपाई नेते परशुराम वाडेकर, भीमा गायकवाड, अजिकीय गाडे, अर्जुन बनसोडे, कैलास ठोसर,योगेश भोसले, राजू भोसले, अमोल कांबळे, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठोसर, रविंद्र सरोदे, विशाल गायकवाड, मोहन काळे तसेच प्रमुख महिला कार्यकर्त्या मंगला आढाळे, बेबी जाधव, लता वाघमारे,शाबाई कांबळे, संगीता ठकार इत्यादी कार्यकर्ते व वसाहती मधील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.










