न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- कुदळवाडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेस मंगळवार (दि. २३) रोजी महापौर राहुल जाधव यांनी भेट दिली.
यावेळी राहुल जाधव, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, क प्रभाग अध्यक्षा आश्विनी जाधव, स्वी. नगरसदस्य दिनेश यादव, आनंदा यादव, शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर, शिक्षक व शिक्षिका आदी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले कि, शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच शाळेला मैदान नसतानाही परिसरात शाळेचे नाव मोठे केले, तसेच खो-खो क्रीडास्पर्धेत सलग ५ वर्ष अजिंक्य राहिल्याबद्दल सूर्यवंशी सरांचे अभिनंदन केले. शाळेची नवीन इमारत लवकरच पूर्ण करुन महापालिकेतील आधुनिक व डीजिटल, उत्कृष्ट शाळा बनविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेमध्ये भौतिक सुविधा नसतानाही शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा उत्तम आहे, असे सभापती व उपसभापती यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर यांनी शाळेतील शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले व उपस्थितांचे आभार मानले.










