न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड परिसरात सध्या पाण्याची टंचाई असून, अनेक ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा वेळी नैसर्गिक पाणवठ्याचे महत्व कळते.
परिसरातील नागरिकांनी पाणी पिण्यायोग्य असलेल्या विहिरींचा वापर केवळ, पिण्याच्या पाण्यासाठी करावा व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अशा विहिरींचा सर्व्हे करून त्यांचे जतन करण्याकरीता कार्यवाही करावी, याकरीता महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना स्वी. सदस्य सतोष मोरे, गोपीकुष्ण धावडे, सागर हिगंणे व दिनेश यादव यांच्या शिष्टमंडळाने भेटून मागणीचे निवेदन दिले
यात सध्या शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई चालू आहे, त्यावर उपाय म्हणून विहीरी, नैसर्गिक स्त्रोत यांचा वापर करून त्या पाण्यावर शुध्दीकरण करून, नागरिकांना पाणी पिण्यासाठी वापर करता येईल. असे नमूद करण्यात आले आहे.















