न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्प विकास आराखड्याचे (डीपीआर) एचसीपीच्या कुणाल पटेल यांनी बुधवारी (दि.२४) रोजी पदाधिका-यांसमोर सादरीकरण केले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड उपस्थित आदी होते.
गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीवर नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट (एचसीपी) सल्लागाराने तयार केला आहे.
यावेळी महापौर राहुल जाधव व पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, या प्रकल्पास लवकरच राज्य सरकारची मान्यता घेतली जाईल व टप्प्याटप्प्याने हे काम हाती घेतले जाणार आहे.