न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- संघटनात्मक आढावा बैठका घेण्याकरीता शुक्रवार (दि. २६) रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. चिंचवडगावातील वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये सकाळी दहा वाजता आढावा बैठक होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर प्रदेशाध्यक्ष दानवे मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मावळ व शिरुरमधील एकूण १२ लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत.