न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतीच्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने कर्तव्यावर असताना महापालिकेच्या सफाई कामगाराच्या थोबाडीत मारल्याची घटना गुरुवारी (दि. २५) रोजी यमुनानगर, निगडी परिसरात घडली. याची पोलीसात तक्रार देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याची साधी तक्रारही पोलिसांनी न घेता टाळाटाळ केली व शेवटी कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली नगरसेवक उत्तम केंदळे याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
या निंदनीय कृत्याचा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त केला असून, यापुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेकेदार कर्मचाऱ्याच्या विरूद्ध पुन्हा असे कृत्य केल्यास, त्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे शिवसेनेचे युवराज दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















